शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

अध्यातम ; वास्तुशास्त्र, फेंग-शुईनुसार प्रसिद्ध गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:44 AM

प्रसिद्ध गणेश मंडळे की जी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जातात. त्यांचा वास्तुशास्त्रानुसार रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया.

ठळक मुद्देफेंग-शुईनुसार समोरील मोकळ्या जागेस लाल फिनिक्स असे म्हणतातमोकळी जागा जितकी लांब तितके चांगले जितकी मोठी दूरदृष्टी तितकी प्रगती, समृद्धी प्राप्त होते

आज आपण महाराष्टÑातील प्रसिद्ध गणेश मंडळे की जी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जातात. त्यांचा वास्तुशास्त्रानुसार रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया.

मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार गणपतीच्या मूर्तीचे मुख एकतर पूर्वेस तोंड करून हवे, अथवा पश्चिमेस तोंड करून हवे. मुंबईचा लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ गणपती, सोलापूरचा आजोबा गणपती व कित्येक प्रसिद्ध गणपती हे सर्व या नियमात बसतात. हा इतका साधा नियम अनेक मंडळांना ठाऊक नाही, याचे वाईट वाटते. असो, जर आपल्या मंडळाचा किंवा घरातीलही गणपती जर दक्षिण-उत्तर बसवला असेल तर पुढील वेळेस तो पूर्व-पश्चिम बसवावा.

फेंग-शुईच्या सिद्धांतानुसार (फेंग-शुई हे भले चीनमधून आलेले आहे, पण यातील अनेक नियमांचा वापर आपले प्राचीन राज्यकर्ते करीत होते म्हणजे मूलत: हे आपलेच शास्त्र आहे.) आपल्या पाठीमागे मजबूत आधार असणे हे प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यास ‘काळ्या कासवाची’ उपमा आहे.

फेंग-शुईनुसार समोरील मोकळ्या जागेस लाल फिनिक्स (फिनिक्स एक काल्पनिक पक्षी जो राखेतून निर्माण होतो.) असे म्हणतात. ही मोकळी जागा जितकी लांब तितके चांगले. तेवढी उत्तम दूरदृष्टी निर्माण होते व जितकी मोठी दूरदृष्टी तितकी प्रगती, समृद्धी प्राप्त होते. सर्वात उत्तम लाल फिनिक्स मिळाला आहे तो लालबागच्या राजास. या गणेश मूर्तीसमोर लांब व सरळ असा रस्ता आहे.वास्तू व फेंग-शुईनुसार आपल्यासमोरील डावी बाजू ही जलतत्त्वाची तर उजवी बाजू ही अग्नितत्त्वाची असते. या तत्त्वांशी संबंधित गोष्टी मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस असतील तर अशा ठिकाणी इच्छापूर्ती होणे म्हणजे मागितलेला नवस पूर्ण होणे, असे अनुभव येतात. चांदी हा धातू जलतत्त्वाशी संबंधित आहे आणि याच धातूच्या आवरणातील चांदीचा उंदीर लालबागच्या राजाच्या, आजोबा गणपतीच्या डाव्या बाजूस आहे, जो जलतत्त्वास जागृत करून भक्तांची इच्छापूर्ती करण्यास मदत करत आहे.

सोलापूरच्या आजोबा गणपती  मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूस (समोर) असलेला एमएसईबीचा इलेक्ट्रिकल ट्रान्स्फॉर्मर हा अग्नितत्त्वाचा निदर्शक आहे.  लालबागचा राजाच्या सिंहासनाच्या डाव्या व उजव्या बाजूस खाली निर्माण केलेल्या (कधी सिंहासारख्या तर कधी असुरासारख्या) प्रतिमा, आजोबा गणपतीच्या सिंहासनावरील सिंहप्रतिमा या फेंग-शुईनुसार वाईट शक्तींना रोखणाºया असतात. अशाच सिंहप्रतिमा शिर्डीच्या साईबाबाच्या सिंहासनावर व पूर्वीच्या कित्येक मंदिरात आपल्याला दिसतात. या प्रतिमांचा प्रभाव आपल्यासमोर दिसतोच आहे. दहशतवाद्यांच्या इतक्या असुरक्षित अशा वातावरणातसुद्धा  लाखो भाविक तहान-भूक विसरून             २४-२४ तास व कधी कधी त्याहून जास्त वेळ रांगेत उभे राहून सुरक्षितपणे दर्शन घेतात, नवस फेडतात हा चमत्कार नव्हे काय.                                                                                                                                                                     - प्रशांत महिंद्रकर

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८