सोलापूर : शहराच्या कमाल तापमानात मागील आठवड्याभरापासून सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी तापमानाने ४१.७ अंश गाठले. उन्हाची काहिली वाढल्यामुळे नागरिकांना चटके बसत आहेत.
सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च म्हणजे ४१.७ अंश सेल्सियसवर तापमान स्थिरावले आहे. गुरुवार १ एप्रिलच्या तुलनेमध्ये सोमवारी तापमानात १.५ अंशांची वाढ झाली त्यामुळे नागरिकांनी एसी आणि फॅनच्या हवेखाली आसरा घेतल्याचे दिसत होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लिंबू पाण्याच्या गाड्यांवरही नागरिकांनी धाव घेतली. काहींनी कोरोनाच्या काळजीने लिंबू पाणी पिणे टाळले.
महाराष्ट्रभर तापमानात वाढ होताना दिसत आहे. उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे . त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेच्या विकारात उन्हाळ्यात वाढ होत भरपूर पाणी पिल्यास डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते . त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
------
मागील पाच दिवसांतील तापमान
- १ एप्रिल ४०.२ २२.४
- २ एप्रिल ३९.९ २२.१
- ३ एप्रिल ४०.८ २२.२
- ४ एप्रिल ४०.८ २३.०
- ५ एप्रिल ४१.७ २३.१