नासीर कबीरकरमाळा : कोरोनामुळे देवदेवतांचे मंदिर बंद झाले़ यामुळे जगप्रसिध्द केमचे कुंकू संकटात सापडले आहे. कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून कुंकू कारखानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे़ कारखान्याच्या मालकांना आर्थिक फटका बसला असून, ३०० कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे.
सौभाग्याचं लेणं म्हणून केमचे कुंकू जगप्रसिध्द आहे. हिंदू संस्कृतीमध्ये कुंक वाला महत्त्व आहे. केम (ता. करमाळा) येथे कुंकू चे २२ कारखाने आहेत़ येथे कुंकू, गुलाल, बुक्का तयार केला जातो. देवदेवतांच्या यात्रा आणि उत्सवात कुंकू, गुलाल, बुक्का मोठ्या प्रमाणात वापरण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आजही सुरू आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू होताच देवदेवतांच्या यात्रा, उत्सवावर बंदी घालण्यात आली़ मंदिरे कुलूपबंद झाली़ त्याचा परिणाम चैत्र महिन्यात पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, येरमाळा, ज्योतिबा, खंडोबा व गावोगावच्या यात्रा यंदा होऊ शकल्या नाहीत.
महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, असाम, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील देवतांच्या उत्सवात गुलाल, बुक्का व कुंकू याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ केम येथील कारखान्यातून सीझनमध्ये ८०० मे. टन गुलाल, बुक्का व कुंकू पाठविला जातो. लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून कुंकू ची कारखानदारी बंद आहे. कारखान्यात काम करणाºया ३०० कामगारांचा रोजगार बुडाला आहे. या काळातही विजेचा स्थिर आकाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बँका, पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज आणि व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे़ सीझनमध्येच कुंकू कारखानदार आर्थिक संकटात सापडला आहे़ लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असून दोन दिवसापासून कारखाने सुरू आहेत़ जिल्हा व राज्यबंदी असल्याने तयार झालेला माल कुठेही पाठवता येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़
आमचं गाºहाणं ऐका..- लॉकडाऊनमध्ये देशभरातील मंदिरे बंद आहेत़ यंदा चैत्र महिन्यातील यात्रा, उत्सव साजरे करता आले नाहीत. पंढरपूरची आषाढी वारी यंदा नाही़ यामुळे कुंकू कारखानदार आर्थिक संकटात आहेत. यातून सावरण्यासाठी कुंकू कारखानदारांना तीन महिन्यांचे वीज बिल, वर्षभराच्या विजेचा स्थिर आकार, कर्जाचे व्याज माफ करावे, असं गाºहाणं मांडत शासनाकडे कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे यांनी केली आहे.