यावर्षी खरीप हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यासाठी मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिपाला चांगला पाऊस पडेल, अशी धारणा झाली होती. मात्र पेरणी हंगाम अर्ध्यावर पोहोचला तरी सर्वदूर पावसाची उणीव शेतकऱ्यांना भासू लागली. त्यामुळे काही ठिकाणी कमी अधिक पावसावर पेरणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जाणार असून दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
चाड्यावर धरली मूठ
खरीप हंगामातील पेरणी रखडत चालल्याने शेतकऱ्याने अखेर चाड्यावर मूठ धरली असून तालुक्यात बाजरी ११८२ हेक्टर (२७.१ टक्के), मका ११२२ हेक्टर (१८.९१ टक्के), तूर १६.८० हेक्टर (१०.८४ टक्के), भुईमूग ३८ हेक्टर (७०.३७ टक्के), सोयाबीन १६.७ टक्के पेरणी झाली असून तृणधान्य २२ टक्के, कडधान्य ३९.९३ टक्के, गळीत धान्य ० टक्के अशी खरीप हंगामात २९ जूनपर्यंत २१.२० टक्के पेरणी करण्यात आलेली आहे.
फोटो :::::::::::::::::
भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे पेरणी करताना शेतकरी बाळासाहेब वाघमोडे.