यंदा कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात्रा मोजक्या भाविक व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यंदा नंदीध्वजाची तसेच पालखीची सवाद्य मिरवणूक रद्द करण्यात आली. साडेसात वाजता होम कट्टयाजवळ मळसिध्दप्पा देवस्थान व म्हेत्रे परिवाराचा नागफणी नंदीध्वज, वीरभद्रेश्वर मंदिराचा नंदीध्वज,सुतार समाजाच्या काळम्मादेवीचा नंदीध्वज आणि मातंग समाजाच्या भुताळसिध्द महाराजांचा नंदीध्वज असे चारही नंदीध्वजाची आगमन झाले. यावेळी नंदीध्वजाची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. बाराबंदी परिधान केलेल्या जकुणे परिवाराने 'कुंभार कन्येचे' प्रतीक असलेल्या बाजरीच्या पेंढीस हिरवी साडी नेसवून, मणी-मंगळसूत्र, जोडवे, बांगडी, हार-दांडा असा सौभाग्य अलंकार घालून सजविले. मानकरी कल्लपा जकुणे यांचा देवस्थानतर्फे मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
यावेळी औदुसिध्द महाराज व गदगी महाराज बळवंत पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा करून मळसिध्दप्पा महाराज की जयच्या जयघोषात होमप्रदीपन करण्यात आले. यानंतर चारही नंदीध्वज व पालखीने होमकट्टयास पाच प्रदक्षिणा घातल्या. यानंतर उपस्थित भाविकांनी मळसिध्दप्पा महाराजांचा जयघोष करीत एकमेकांना तीळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास श्री मळसिध्दप्पा यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राजेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख,मळसिध्दप्पा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष अमोगसिध्द पुजारी, माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बाळासाहेब देशमुख, सिध्दलिंग मलकारी म्हेत्रे, अनंत म्हेत्रे, विजयकुमार धर्माधिकारी, मंजुनाथ धर्माधिकारी, संजय म्हेत्रे, विठ्ठल म्हेत्रे, मल्लिकार्जुन कांबळे, बलभीम कांबळे, सीताराम जकुणे, मळसिध्द जकुणे,बाबू जकुणे,सुरेश पाटील,तमण्णा पुजारी,वागेश म्हेत्रे,गौरीशंकर मेंडगुदले, मुत्या वाडकर,अविनाश देशमुख, सुरेश टेळे,भीमा देशमुख, सोमनिंग पुजारी,भगवान व्हनमाने, अमोगसिध्द कुंभार,दत्ता देवीदास, नागू घाटे,यांच्यासह ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
-----