यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेरामेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या देव-देवतांना तैलाभिषेक करण्यात आला. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला शंभर वर्षांची मोठी परंपरा आहे. यंदा कोरोना महामारीमुळे शासनाने मोठी गर्दी होणाऱ्या यात्रेवर बंदी घातली आहे. यामुळे देवस्थान पंच कमिटीने यंदाच्या वर्षी दुधनीतील यात्रा रद्द करून केवळ धार्मिक विधी पार पडल्या.
सकाळी अक्षतेचे मानकरी इरय्या पुराणिक यांच्या हस्ते घरात पोथी-पुराण ग्रंथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर गाजावाजा न करता पोथी-पुराण सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सुगडी पूजनानंतर मानकरी इरय्या पुराणिक आणि चन्नवीर पुराणिक यांच्या उपस्थितीत संमती वाचन पार पडले.
यात्रेचा समारोप होम प्रदीपन कार्यक्रमाने पार पडला.
यावेळी दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, मानकरी इरय्या पुराणिक, चन्नविर पुराणिक, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, गिरमल्लप्पा सावळगी, मलकाजप्पा अल्लापूर, श्रीमंतप्पा परमशेट्टी, बसण्णा धल्लू, सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सिद्धाराम मल्लाड, हणमंतराव पाटील, लक्ष्मीपुत्र पाटील, मलकण्णा गुड्डोडगी, मल्लिनाथ पाटील, मल्लिनाथ येगदी, गुरुशांत ढंगे, अप्पू मंथा, रेवणसिद्ध पाटील, सुगुरेश बाहेरमठ, शिवानंद फुलारी, मल्लय्या पुराणिक, गुरूपादय्या सालीमठ, नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, महेश पाटील, अतुल मेळकुंदे, अप्पू परमशेट्टी, शामराव फुलारी, गुरुषांत अल्लापूर, बसवराज हौदे, सीद्दण्णा गुळगोंडा, शिवानंद बिंजगेरी, काशिनाथ गाडी, शांतलिंग वागदरी, रमेश निंबाळ, दौलत हौदे, संतोष पोतदार, सातलिंग अंदेनी, श्रीशैल घुळणूर, आदीजण उपस्थित होते.
------
कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाली यात्रा.
दुधनी येथील श्री सिद्धरामेश्वर यात्रेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. यंदा दुधनी गावच्या इतिहासात प्रथमच भक्ताविना केवळ मांकारीच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला. कोरोनाचे पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. यात्रेच्या पहिला दिवशी महिलाचे भोगी, दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा, तिसऱ्या दिवशी होम अशा तीन दिवसाने यात्रेचा समारोप करण्यात आला. दारूकाम, कुस्ती, जनावर बाजार असे काही कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत.
-------
फोटोओळ
दुधनी येथील श्री सिद्धरामेश्वर देवाचा अक्षता सोहळा पार पाडताना डॉ. शांतलिंगेश्वर म्हास्वामीजी, मानकरी व भक्तगण दिसत आहेत.
-----