आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसºया दिवशी आज भक्तिभावपूर्ण वातावरणात होम मैदानावर होम विधी झाला. नागफणी, बाशिंग आणि विद्युत रोषणाई केलेली नंदीध्वजांची मिरवणूक रात्री दोन वाजता आल्यानंतर होमविधीस प्रारंभ झाला. भाविकांनी यावेळी ‘हर्र बोला हर्र’चा गजर केला. होमविधी झाल्यानंतर भाविकांनी मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगूळ दिला. त्यानंतर भगिनी समाज येथे भाकणुकीचा कार्यक्रम झाला.होमविधीसाठी नंदीध्वजांची मिरवणूक सायंकाळी पाच वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून निघाली. सायंकाळी निघणारी ही मिरवणूक अतिशय देखणी होती. मिरवणूक राजवाडे चौकात आल्यानंतर सोन्या मारुती ते जुनी फौजदार चावडी मार्गावर रोषणाईची तयारी करण्यात आली. सात वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज दत्त चौकमार्गे या परिसरात आले. जुनी फौजदार चावडी येथे पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली. २ ते ७ नंदीध्वजांना बाशिंग आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. नागफणी बांधलेल्या पहिल्या नंदीध्वजाची हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर सोमनाथ मेंगाणे यांनी एकट्याने हा नंदीध्वज होम कट्ट्यापर्यंत आणला. होम कट्ट्यावर नंदीध्वज आल्यानंतर राजशेखर हिरेहब्बू हे होमकुंडात उतरले. बाजरीच्या पेंडीचा वापर करून कुंभार कन्येची प्रतिकृती तयार करण्यात आली. कुंभार कन्येस शालू नेसवण्यात आला. त्यानंतर मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार, दंडा आदी सौभाग्य अलंकार घालण्यात आले. त्यानंतर हिरेहब्बू यांनी होम प्रदीपन अर्थात कुंभार कन्येस अग्नी दिला. यावेळी हिरेहब्बू यांच्या हस्ते कुंभार यांना विडा देण्यात आला. नंदीध्वज, पालखी आणि हिरेहब्बू यांनी होमास पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर तिळगूळचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम झाला.--------------------करमुटगी लावून स्नानयोगदंडास करमुटगी लावून स्नान घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सकाळी ९ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून निघाली. संमती कट्ट्याजवळ नंदीध्वज आल्यानंतर योगदंडाचा स्नानविधी झाला. त्यानंतर पालखीतील मूर्तीस करमुटगी लावण्यात आली आणि स्नानविधी झाला. यानंतर सातही नंदीध्वजांना स्नान घालण्यात आले. अमृतलिंगाजवळ राजशेखर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते गंगापूजन झाले. देशमुखांना मानाचा विडा दिल्यानंतर मंदिरातील ‘श्रीं’च्या पादुकांना करमुटगी लावून स्नान घालण्यात आले. हिरेहब्बू यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा झाली.------------------मेंगाणेंना सलग तिसºया वर्षी मान- नागफणीचा नंदीध्वज पेलण्याचा मान सलग तिसºया वर्षी सोमनाथ मेंगाणे यांनाच मिळाला. फौजदार चावडी येथे पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधल्यानंतर मेंगाणे हे तेथून होम कट्ट्यापर्यंत नंदीध्वज एकट्यानेच पेलला. यासाठी त्यांनी दिवसभर उपवास केला. यात्रेतील अन्य सेवेकरी या मार्गावर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिद्धरामांचा जयजयकार करत होते.
‘हर्र बोला हर्र’ च्या गजरात होमविधी सोहळा, सोलापूरात भाविकांची मोठी उपस्थिती, नंदीध्वजांची देखणी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:59 PM
ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसºया दिवशी आज भक्तिभावपूर्ण वातावरणात होम मैदानावर होम विधी झाला. नागफणी, बाशिंग आणि विद्युत रोषणाई केलेली नंदीध्वजांची मिरवणूक रात्री दोन वाजता आल्यानंतर होमविधीस प्रारंभ झाला.
ठळक मुद्देनागफणीचा नंदीध्वज पेलण्याचा मान सलग तिसºया वर्षी सोमनाथ मेंगाणे यांनाचयात्रेतील अन्य सेवेकरी या मार्गावर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिद्धरामांचा जयजयकारयोगदंडास करमुटगी लावून स्नान घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक