सोलापूर : सोलापूर ते पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची विसरलेली दोन लाख रुपयांची बॅग रेल्वेच्या अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे परत केली. ही प्रामाणिकपणाची घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर घडली.
याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, विलास जोशी (पीएनआर: 30 8430०4333366) हेे शुक्रवार 20 फेब्रुवारी 2020 रोजी गाडी क्रमांक 11013 ने पुण्याहून सोलापूरकडे येत होते. दरम्यान सोलापुरात उतरायला असताना ते २ लाखांची रोकड व इतर सामान असलेली बॅग विसरली. त्यावेळी ऑन ड्युटी असलेले रेल्वेचे अधिकारी हेगणेकर व परांजपे यांनी त्यांची बॅग गोळा केली आणि ओळख पटल्यानंतर विलास जोशी यांना प्रामाणिकपणे परत केली. रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रेल्वेच्या अधिकाऱ्याने प्रामाणिकपण परत केल्यानंतर विलास जोशी या प्रवाशाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनीही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या त्या रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.