चपळगाव : लॉकडाऊन काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात चांगली सेवा देणाऱ्या महिलांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था प्रणित हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शिवजन्मोत्सव निमित्त ‘कोविड योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सखी महिलांसाठी हळदी, कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या महिला डॉक्टर्स डॉ. आसावरी पेडगावकर, डॉ. सायली बंदीछोडे, डॉ. जयश्री आळ्ळे, डॉ. मंजुषा मेंथे, डॉ. साधना पाटील, डॉ. दीपमाला आडवितोटे, डॉ. सहारा बेगम मोमीन-सलगरकर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या महिला आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले व सचिवा अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष व बहुउद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ जन्मेजयराजे भोसले व अमोलराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, हिकरणीच्या पल्लवी नवले, छाया पवार, स्मिता कदम, पल्लवी कदम, सुवर्णा घाटगे, स्वाती निकम, ज्योती शिंदे, संगीता भोसले, उज्ज्वला भोसले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, सपना माने, रुपाली पवार, राजेश्री माने, मल्लम्मा पसारे या महिला हिरकणीच्या सदस्या व वागदारीच्या स्त्री शक्ती महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन पल्लवी कदम यांनी केले तर आभार रत्नामाला मचाले यांनी मानले.
----
फोटो : २३ चपळगाव
कोविडयोद्धा म्हणून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, रत्नमाला मचाले यांनी केला.