सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा युवराज यशवंतराव होळकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर महोत्सवाचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यात शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. नेमिनगर, चांदवड येथील स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मोहनलाल चंपालाल सांखला सभागृहात हा सोहळा होळकर राजघराण्यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्राचार्य जी. एच. जैन, संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, प्राचार्य महादेव कोकाटे, संयोजक रामभाऊ लांडे, डॉ. दिलीप बलसेकर, उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.