अध्यक्षस्थानी चिणकेच्या सरपंच माधुरी मिसाळ होत्या. तर प्रमुख पाहुणे डाॅ. माधुरी मिसाळ, माजी मुख्याध्यापिका नंदा मिसाळ उपस्थित होत्या.
यावेळी आरोग्य सेविका गुराडे, आशा वर्कर निर्मला गुरव, रंजना जाधव, शैला मिसाळ, अंगणवाडी सेविका, उल्फा रासकर, लतिका शितोळे, राजश्री मिसाळ, सविता काटे यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मुळशी येथे राज्यस्तरीय सांघिक स्पर्धेसाठी निवड झालेली नेटबाॅल चॅम्पियन वैदिका पाटील, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जागतिक दर्जाच्या व प्रतिष्ठा एमडीआरटी अमेरिकन पुरस्कार सविता मिसाळ यांना मिळाल्याबद्दल, मुख्याध्यापिका नंदा मिसाळ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त, यलमर-मंगेवाडीच्या नूतन सरपंच प्रीती जावीर, अजनाळेच्या सरपंच सुजाता देशमुख, वझरेच्या सरपंच प्राजक्ता सरगर यांचा सन्मान केला.
प्रास्ताविक सोलापूर सोशल फाउंडेशनचे सांगोला समन्वयक शंभू माने यांनी केले. सूत्रसंचालन उल्का रासकर यांनी केले. तर विनायक मिसाळ यांनी आभार मानले. यावेळी ग्रामसेवक सागर आदाटे, गोविंद विभुते, सविता मिसाळ, रेखा मिसाळ, अर्चना मिसाळ, आश्विन मिसाळ, सिंधू कोळी, आशा लिगाडे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.