प्रशांत कोळसे हे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळावर विज्ञान विषयाचे सदस्य असून, ते राज्यस्तरीय मार्गदर्शकही आहेत. बालभारतीच्या अभ्यासगटाचे सदस्य असल्याने त्यांनी ६ वी ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकात भौतिकशास्त्र विषयांचे लेखनही केले आहे. एनसीएफ, एससीएफ, आंतरराष्ट्रीय शाळा साहित्य निर्मिती, स्वाध्याय निर्मिती, दीक्षा ॲप साहित्य मूल्यांकन, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र मूल्यांकन, ई-साहित्य निर्मिती व मूल्यांकन, शाळासिद्धी अशा अनेक राज्यस्तरीय समित्यांमध्ये काम केले आहे. त्यांचे आजपर्यंत ५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विचार करून रयत शिक्षण संस्थेने त्यांना आदर्श विज्ञान शिक्षक, निष्ठावान रयत सेवक या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे आणि आज व्होडाफोन आयडियाची एक लाखाची स्कॉलरशिप मिळाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला आहे.
शिक्षकाच्या कार्याचा सन्मान; मिळाली एक लाखाची स्कॉलरशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:15 AM