सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात सोलापूर शहर दलाचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी कलम १४४ फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे.
दरम्यान, १३ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साखर कारखाना परिसरात जमावबंदी असणार आहे. दरम्यान, श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराच्या १ किलोमीटरच्या आत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण सेवा वगळता संचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहणार आहेत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत.