सोलापूर : कोरोना या संसर्गजन्य आजाराने हजारो लोकांचा बळी घेतला आहे; मात्र यामध्ये शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू हिरावून घेतले आहे. घरातील कर्ताधर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
सोलापूर शहरांमध्ये दि.१२ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेली व्यक्ती साठ वर्षांच्या पुढील जरी असली तरी ते किराणा दुकान चालवून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोन फौजदारासह १० कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वसामान्य गरीब घरातील अनेक कर्तेधर्ते पुरुष कोरोनामध्ये उपचारादरम्यान मरण पावले.
संसाराची संपूर्ण जबाबदारी असलेली पुरुष मंडळी उपचारादरम्यान मरण पावले. कोठून हा कोरोना आला आणि कुटुंबाचा आधारवड असलेल्या पुरुषाला घेऊन गेला. हा प्रकार सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. एप्रिल २०२० पासून सुरुवातीला साठ वर्षांच्या पुढील पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. मात्र त्यानंतर हळूहळू पंचावन्न, पन्नास, ४५, ४०, आणि आता तर ३० ते ३५ वयोगटातील पुरुष मंडळी कोरोनाने दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. जून २०२१ मध्ये अवघ्या ३५ वर्षांच्या फौजदाराचा कोरोनानंतर फुफ्फुसाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. घरातील पुरुष मंडळी गेल्याने अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू तर पुसलेच मात्र त्यासोबत त्यांची लहान मुले, मुली, आई-वडील, भाऊ, बहीण ही मंडळी देखील पोरकी झाली आहेत.
निराधार योजनेसाठी केले अर्ज
- 0 सर्वसामान्य कुटुंबातील महिलेचा पती मिळेल ते काम करून घर चालवत होता. त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेने पती गेल्यामुळे निराधार योजनेसाठी अर्ज केला आहे.
- 0 पती असताना घरकाम करणाऱ्या महिलेला आता स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी चार घरच्या धुण्या-भांड्याच्या कामाला जावे लागत आहे. या महिलेनेही निराधारसाठी अर्ज केला आहे.
- 0 शहर व जिल्ह्यामध्ये असे अनेक महिला आहेत ज्यांचे पती मरण पावल्यामुळे शासनाच्या निराधार योजनेकडे धाव घ्यावी लागत आहे.
- 0 पोलीस खाते असो किंवा कोणताही शासकीय कर्मचारी त्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. तर काहींना अनुकंपाखाली नोकरीही मिळाली आहे.
-
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण- १५६७५७
बरे झालेल्या रुग्णांची संख्या- १४९४६८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- २९५४
एकूण रुग्ण - ३०९१७९
महिला रुग्ण - ६१७७५