कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण आणि साखरेवाडी या दोन गावात आठवडाभरात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. या दोन्ही गावात जवळपास १५ जुनाट घरांची पडझड झाली आहे. या आपतग्रस्तांना निवारार्थ शाळा आणि समाज मंदिरात हलविण्यात आले आहे.
आठवडाभर पावसाची संततधार आहे. साखरेवाडी आणि कळमण या गावात अनेक जुनी माळवदाची घरे असून या पावसामुळे जास्त बाधित झाली. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. या पडझडीनंतर साखरेवाडीचे उपसरपंच पप्पू साखरे, कळमणचे सरपंच पांडुरंग लंबे, उपसरपंच सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य भास्कर मुटकुळे, विनाेदा भोरे, अजित पाटील, सागर शेळके यांनी पाहणी केली. याबाबत सुनील पाटील यांनी तहसीलदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यांच्याकडून लवकरच पाहणी होणार असून आपतग्रस्तांमधून नव्या घरकुलाची मागणी होत आहे.
----------
फोटो : ०७ कळमण
आठवडाभरातील पावसामुळे कळमण आणि साखरेवाडीत घरे कोसळली आहेत.