पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळविण्यासाठी हजारो नागरिकांनी कागदपत्राची जुळवाजुळव केली. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना, नागरिकांनी दहा ते पाच हजार रुपये खर्च केले आहेत व नगरपरिषदेच्या घरकूल विभागाकडे दाखल केली आहेत. या दरम्यान, काही लाभार्थ्यांचे बांधकाम परवानगी मिळून घर बांधण्यास सुरुवात झाली.
यावेळी ४० हजार व ६० हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले, परंतु एक वर्ष उलटून गेले, तरी उर्वरित रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन घर बांधकाम पूर्ण केलेले आहे, यामुळे लाभार्थी रस्त्यावर व आर्थिक संकटात आले आहेत.
यावेळी रासपचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, माढा विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे, शहराध्यक्ष अभिजीत सोलंकर, जितेंद्र गायकवाड, सूरज गायकवाड, भैय्या खरात, किरण अस्वरे, परवेश दालवाले, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते.
----
240821\1126img-20210824-wa0326.jpg
कुर्डूवाडी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता त्वरीत दयावा म्हणून निवेदन सादर करताना रासपाचे कार्यकर्ते.