पंढरपूर येथे खा. निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने वटहुकूम काढून विशेष अधिवेशन बोलवावे. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन आरक्षण देण्यास आम्ही तयार आहे, असे सांगावे. राज्य सरकार जर प्रामाणिकपणे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर भाजपा पूर्ण ताकदीने त्यांच्या बरोबर असेल. आरक्षणाचा प्रश्न चिघळण्यापूर्वी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करावा. यामध्ये कोणत्या त्रुटींचा अभ्यास करून लवकर नवीन अहवाल तयार करून पुनर्विचार याचिका दाखल करावी, असेही खा. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, युवक नेते प्रणव परिचारक, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, बादलसिंह ठाकूर, संतोष हालकुडे आदी उपस्थित होते.
---
छत्रपती संभाजीराजेंनी भरकटू नये
आरक्षण प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला असून, पुढील भूमिका त्यांनी रायगडावरून ६ जून रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. परंतु यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून त्यांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच ते स्वतंत्र पक्ष काढण्याबाबतदेखील चर्चा कानावर येत आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर भरकटू नये, असेही खा. निंबाळकरांनी स्पष्ट केले.
----
प्रतिकात्मक रूपात व्हावी वारी
कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. पंढरीची वारी प्रतिकात्मक रूपात तसेच पालखी सोहळेदेखील मागील वर्षीप्रमाणे एसटीने दाखल व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---