शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

निवडणुकीच्या तोंडावरच यांना शिवसेना कशी काय आठवली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:38 AM

आमदार नारायण पाटलांचा सवाल; करमाळ्यात ५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश

ठळक मुद्दे- जेऊर येथे आमदार नारायण पाटील यांचा सत्कार- विधानसभा निवडणुकीसाठी पाटील गटाची मोर्चेबांधणी- रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलणार

करमाळा :  काम करायचे नाही आणि गटतट, पक्ष बदलून निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना कशी काय आठवली? अशा शब्दात  शुक्रवारी जेऊर येथीेल सत्कार समारंभात आमदार नारायण  पाटील यांनी रश्मी बागल यांच्या  शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत आमदार नारायण पाटील यांनी टीका के ली.

आ.नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात जेऊर येथे नारायण पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ आयोजित केला होता.  यावेळी त्यांनी बागलांवर वरिल टिका केली. यावेळी आनंदयोगी महाराज, कर्मयोगी गोविंद पाटील, पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेना उपजिल्हा प्रमूख महेश चिवटे, तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारिया,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहर अध्यक्ष रामा ढाणे,पैलवान अफसर जाधव, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, राजाभाऊ कदम, अजित तळेकर, अ‍ॅड, अजित विघ्ने,अतुल पाटील, अ‍ॅड़ राहूल सावंत, प्राचार्य जयप्रकाश बीले, माढा तालुक्यातील पी.डी.पाटील, व्यंकटेश पाटील, तात्या गोडगे, सचिन बागल, प्रा.ननवरे, आनंद गोडगे, भारत कापरे, फैय्याज बागवान, विजयसिंह परबत यांची  प्रमुख उपस्थिती होती.

जेऊर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना आ.नारायण पाटील म्हणाले, विरोधक दिशाभूलीचे राजकारण करत आहेत़ आदिनाथ कारखाना काही काळ विरोधकांच्या ताब्यात होता़ पण मकाई कारखाना स्थापनेपासून बागलांच्या ताब्यात आहे़ मग त्या कारखान्याच्या वाईट परस्थितीला कोण जबाबदार आहे? असा सवाल करीत आ. पाटील यांनी आदिनाथ कारखान्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी शरद पवारांनी २५ कोटी रूपये दिले तरी कारखान्याच्या कामगारांच्या पगारी सुध्दा करता आलेल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट के ले. 

पन्नास युवकांचा शिवसेनेत प्रवेश...यावेळी सुनिल तळेकर, प्रा.संजय चौधरी, शिवाजी बंडगर, महेश चिवटे, सुधाकर लावंड, देवानंद बागल, प्रवीण कटारिया, गहिनीनाथ ननवरे, अ‍ॅड़ अजित विघ्ने यांची भाषणे झाली. यावेळी जेऊरवाडीचे सचिन निमगिरे यांच्यासह ५० युवकांनी शिवसेनेते प्रवेश केला़ त्यांचा आ.नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सेनेचे तिकीट नारायण पाटलांनाच..शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारिया यांनी आपल्या भाषणातून आमदार नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिवसेना आमदार म्हणून केलेली विकास कामे व शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करीत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे  नारायणआबा यांनाच उमेदवारी देतील म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Patilनारायण पाटीलShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकkarmala-acकर्मला