सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी सरकारला दिले़
आ़ भालके यांच्या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या खा़ अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यशैलीवर चौफे र टीका केली़ यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, मनपा पक्षनेते चेतन नरोटे आदींची उपस्थिती होती़
दिल्ली येथील क ाँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतीमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याची माहिती खा़ अशोक चव्हाण यांनी दिली़ याच मुद्यावर बोलताना खा़ चव्हाण म्हणाले, निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़ दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे़ ४ वर्षांत ८ कोटी तरुणांना रोजगार मिळायला हवा होता़ तो मिळालाय का, असा सवाल करीत या सरकारने तरुणांची घोर फसवणूक केल्याचा आरोप केला़
सत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार तोडफोडीचे राजकारण करीत आहे़ पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिल्याचा उल्लेख टाळत खा़ चव्हाण म्हणाले, भाजपा नेत्यांना त्यांच्याच पक्षातील दिवंगतांबद्दल आस्था नाही़ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्व़ वनगा ऐवजी सावरा असा उल्लेख करतात़ जिवंत आणि मृत व्यक्तीबाबत तारतम्याने बोलायचे असते हे त्यांना माहिती नाही, असा टोला लगावला़
या पत्रकार परिषदेला हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, अॅड़ अर्जुन पाटील (ब्रह्मपुरीकर), केशव इंगळे, सातलिंग शटगार आदी उपस्थित होते़