- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्य शासनाकडे प्रलंबित ६ मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षावरील बहिष्कार टाकून आंदोलन करणार असल्याची माहिती, अखिल भारतीय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. आर.बी. सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस कृती समितीचे संघटक राजा बढे, राजेंद्र गोटे, गोविंद जोशी, माधव राऊळ, अनिल लब्रे, दिलीप पवार, सोमनाथ सोनकांबळे, अजितकुमार संगवे, सुनील थोरात, रविकांत हुक्किरे, दत्ता भोसले, राजेंद्र गिड्डे, राहुल कराडे, आनंद व्हटकर, हणमंत खपाले आदी उपस्थित होते.