आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला़ यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१़३२ टक्के इतका लागला आहे़बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व शहरातून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून ६१ हजार ३४५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते़ त्यापैकी ४४ हजार ६६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यात अ श्रेणीतून १८ हजार ७२८, ब श्रेणीतून २१ हजार १८७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ --------------------तालुकानिहाय निकालअक्कलकोट : ८७़९०%बार्शी : ९०़४१%करमाळा : ८८़५९%माढा : ८७़४०%माळशिरस : ९२़२९%मंगळवेढा : ९२़७७%मोहोळ : ९४़१३%पंढरपूर : ९२़४६%उत्तर सोलापूर : ९१़३०%सांगोला : ९३़९१%--------------------लक्ष्मीला मिळाले ६५ टक्के गुणदोन्ही हात नसताना १२ वी चा पेपर पायांनी लिहून लक्ष्मी शिंदे या विद्यार्थींनीने बारावी परीक्षेत ६५ टक्के गुण घेऊन यश मिळविले़ लक्ष्मी शिंदे हे वालचंद महाविद्यालयाची विद्याथींनी आहे़ या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़
बारावीचा निकाल- सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१़.३२ टक्के
By admin | Published: May 30, 2017 2:23 PM