सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कामती येथे कार व मोटारसायकलचा अपघातात झाला़ याचवेळी माजी आमदार दिलीप माने हे आपल्या इनोव्हा गाडीतून कामती येथे लग्नसमारंभासाठी जात होते़ मात्र अपघात पाहता त्यांनी आपली इनोव्हा कार थांबवून अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत उपचारासाठी कामतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी आपल्या स्वत:च्या इनोव्हा गाडीतून सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजी आमदार दिलीपराव माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. दरम्यान कामतीजवळ मोटारसायकल व कारचा अपघात झाला. या अपघातात जागीच एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला होता़ हा अपघात झाला त्यावेळी माजी आमदार हे त्याचठिकाणी होते़ अपघाताग्रस्तांना उपचारासाठी कामती आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र तेथील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते व तेथे अॅम्ब्युलन्सही उपलब्ध नव्हती. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता दिलीप माने यांनी आपल्या इनोव्हा गाडीतून त्या दोघांनाही तात्काळ आरोग्य केंद्रात पाठविले.
माने यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून त्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावले. माजी आमदार दिलीप माने यांच्या या चांगल्या कार्यामुळे सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचे दर्शन घडल्याचे आज दिसून आले़