सोलापूर : सुरूवातीच्या कडक लॉकडाऊनमध्ये भरडलेले सोलापूरकर शहाणे होतील, असे वाटले होते. मात्र, अनलॉकनंतर उलट ते अधिकच उसळले. सध्या सोलापूरचा मृत्यूदर संपूर्ण भारतात तिसºया क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूमुळे दैनंदिन व्यवहाराला मर्यादा पडल्या. सध्या पूर्ण नसले तरी बहुतांश उद्योग सुरु असून पुन्हा बंद झालेले व्यवहार सुरु होत आहेत. इतके दिवस काम नसलेल्या कामगारांच्या चेहºयावर आज काम असल्याने हसू उमललेले आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच्या १०० दिवसात सोलापूरकरांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. दैनंदिन गरजेच्या वस्तू घेताना झालेली कसरत, बाहेर पडताना आणि घरी आल्यानंतर स्वच्छतेची काळजी, नेहमीचे सोबती झालेले सॅनिटायझर आणि मास्क, यांच्या सोबतीमुळे दैनंदिन जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेने जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सेवा उभ्या करुन कोरोना आजाराचा प्रतिकार करण्याची तयारी करण्यात आली.
कोरोनाची चाचणी करण्यापासून ते प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल सक्षम झाले आहे. महापालिकेने देखील तीन ठिकाणी कोरोना चाचणीची सोय केली आहे.
विडी उद्योग व यंत्रमाग हे रोजगार मिळवून देणारे उद्योग बंद होते. यावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. आता या उद्योगांना परवानगी मिळाल्याने रोजगार सुरु झाला आहे. उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यावर बेरोजगार झालेल्या सर्वांनाच काम मिळेल. तर उरलेले काही उद्योग व व्यवसाय काही सशर्त अटीने पुन्हा सुरु होतील.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले. सर्वसामान्यांनी दोन ते तीन महिन्याचा किराणा माल आधीच घरी आणून ठेवला. किराणा माल आणत असताना नागरिकांना अनेक कसरती कराव्या लागल्या. दुकान चालकांनीही फिजिकल डिस्टन्स ठेवत किराणा दिला. सध्या किराणा व भाजीपाल्याचा भाव कमी होताना दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये राहणाºया सुमारे नऊ हजार नागरिकांना जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात आली. बाहेरुन आलेल्या व्यक्तीचे संस्थात्मक अलगीकरण करुन कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे विषाणू पसरण्यास अटकाव घालणे काही प्रमाणात शक्य झाले.
शाळा, महाविद्यालयेही बंद असले तरी या काळात अभ्यास मात्र सुरु आहे. आॅनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना घरीच शिकविण्यात येत आहे. या काळात अनेकांनी वेबीनारला उपस्थित दाखवत प्रमाणपत्र मिळविले. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अभ्यासक्रमासोबतच कला, उत्सवांचे कार्यक्रमही घेण्यात आले. पुढील टप्प्यात नाट्यगृह, चित्रपटगृह, जीम, शाळा, महाविद्यालये यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच या सर्वांना परवानगी मिळाल्यास शहर व जिल्हा हा पहिल्यासारखा पूर्वपदावर येईल.
सर्वेक्षण आणि चाचणीवर भर जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षणावर प्रशासनाने भर दिला. महापालिकेची यंत्रणा सोबतच नर्सिंग अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांची मदत घेण्यात येत आहे. ५५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना किंवा इतर आजार आहेत का हे पाहण्यात येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीची सोय करण्यात आली. फक्त सोलापूरच नव्हे तर लातूर आणि उस्मानाबाद येथील स्वॅब तपासण्यात आले.सध्या शहरात चार ठिकाणी स्वॅब टेस्ट करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच अँटीजेन टेस्टही करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या विडी, यंत्रमाग, साखर कारखाने, फर्निचर यांच्यासह जवळपास सर्वच उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. यंत्रमाग उद्योग सुरू झाल्यामुळे सोलापुरातील वीस ते पंचवीस हजारांहून अधिक कामगारांना रोजगार मिळाल्याचे यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अद्याप विडी विक्री सुरू नाही. त्यामुळे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अडचणी येत आहेत. १००% विडी विक्री सुरू झाल्यास कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु करता येतील आणि सर्वच ६० हजार कामगारांना रोजगार देता येईल. - बाळासाहेब जगदाळे, प्रवक्ते : सोलापूर विडी उद्योग संघ सोलापूर
जीम, बंदिस्त स्टेडियम हे सध्या बंद आहेत. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना त्वचेसंदर्भात काम करण्यास बंदी आहे. नाट्यगृह, चित्रपटगृह, हॉटेल आदी सध्या बंद आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी वाढू शकते. याचा विचार करुन हे निर्बंध ठेवण्यात आले आहेत.
काही उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. नाट्यगृह व चित्रपटगृह यांना अद्याप परवानगी नाही. राज्यभरातील निर्माते हे नाट्यगृह सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. घाई करुन चालणार नसून हा आरोग्याचा प्रश्न असल्याने खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.- गुरु वठारे, नाट्यव्यवस्थापक
लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक हे सोलापुरात अडकून पडले होते. त्यांच्या निवाºयाची सोय केली. रोजगार नसल्याने गरिबांना धान्यांची गरज होती. शासनामार्फत मिळालेले धान्य गरजूपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. संसर्ग वाढू नये यासाठी
यंत्रमाग तसेच विडी उद्योग हे तर सर्वाधिक रोजगार देणारे उद्योग आहेत. दोन्ही उद्योग बंद असल्याने हजारो कामगारांचा रोजगार बुडाला. - राजू राठी, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स सोलापूर