सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हावे आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून ते होम मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या दर्शनस्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आले आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी गाड्यासह हजारो सभासद, कामगार व विविध पक्षातील लोक उपस्थित होते. या मोर्चामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यासह कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद, उमरगा, नळदुर्ग आदी भागातील कारखान्यांचे सभासद व शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. राजकीय सर्वपक्षीय राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी आमदार आडम मास्तर यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था सभेच्या स्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोर्चाचे रूपांतर होम मैदानावर सभेत झाले. सध्या सभेत विविध मान्यवरांची मनोगते सुरू आहेत. पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवला होता.