पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या आदेशाने सपोनि प्रशांत हुले, पोलीस काॅन्स्टेबल रामचंद्र जाधव, पोलीस नाईक प्रमोद गवळी, पोलीस काॅन्स्टेबल राहुल देशमुख, सचिन देशमुख, बाबासाहेब पाटील, गणेश कुलकर्णी हे सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. सांगोला ते वाढेगाव रस्त्यावरील समर्थ पावडर कोटिंग आणि स्टील ट्रेडिंग कंपनीबाहेर खाकी रंगाचा छापडीचा बॉक्स संशयितरीत्या पडल्याची बातमी मिळाली. त्याआधारे सपोनि प्रशांत हुले यांनी तेथे छापा टाकून वर्कशॉप बाहेर पत्र्याच्या भिंतीलगत गवतामध्ये एक खाकी रंगाचा छापडीचा बॉक्स श्री समर्थ स्टील फॅब्रिकेशनचे रवींद्र कोरे आणि त्यांच्या बाजूला व्यवसाय करणारे त्यांचे मेहुणे समर्थ स्टील ॲण्ड पावडर कोटिंगचे पंकज चौगुले यांच्याकडे त्या बॉक्सबाबत विचारपूस केली. त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष सदर बॉक्स फोडून पाहणी केली. त्यामध्ये सुमारे नऊ हजार ७५० रुपये किमतीचा ३९० ग्रॅम गांजा आणि ४८० रुपये किमतीचे काचेचे १२ ग्लास असा दहा हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गांजासह सव्वादहा हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:19 AM