तालुक्यातील ठरावीक पट्ट्यात ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन खरेदी करून शेतीची बांधबंदिस्ती, नाला, विहीर खोदाई, शेती दुरुस्ती, ऊस वाहतूक अशा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून १५ ते २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाला रोजीरोटी देणाऱ्या वाहन व्यवसायातील स्पर्धा, गावोगावी काम करताना होणारी फसवणूक, मजुरांचा अभाव, इंधनाचे वाढते दर अशा अनेक गोष्टींचा फटका वाहन व्यवसायाला बसत आहे. यात कोरोना महामारीची भर पडली. त्यामुळे अनेकांचे कर्जचे हप्ते थकले आहेत. वाढत्या व्याजाने यातील व्यावसायिक अर्थिक चक्रव्यूहात अडकत चालले आहेत.
वाहनांचा लेखाजोखा
माळशिरस तालुक्यातील फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, निटवेवाडी, कोथळे, नातेपुते, फोंडशिरस, जळभावी, गोरडवाडी आदी २५ ते ३० गावांत वाहनांचा व्यवसाय केला जातो. तालुक्यात २ हजार ते २,५०० ट्रॅक्टर, ४५० ते ५०० जेसीबी, १५० ते २०० पोकलेन मशीन आहेत. अशा शेती उपयोगी मशीनच्या माध्यमातून ५ हजार तरुणांची या वाहनांचा व्यवसाय करीत मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, कर्नाटक या भागात भटकंती सुरू असते.
कोट :::::::::::::::::::::
बेरोजगारीवर मात करत, अनेक तरुणांनी व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या या व्यवसायातील अडचणींमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येत आहे. लोकप्रतिनिधी व सरकारने वाहन व्यवसायातील अडीअडचणींचा सकारात्मक विचार करून लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
- दादासाहेब यमगर, वाहन व्यावसायिक, गोरडवाडी