आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आपण आतापर्यंत पैशांची बँक़़़ ब्लड बँक़़़ बियाणे बँक़़़ धान्य बँक़़़पाहिली असेल़ मात्र शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या गरजू, गरीब, वंचित, परगावाहून आलेल्या व आपला रूग्ण लवकर बरा व्हावा याच काळजीत बसलेल्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवणाचे डबे पुरविणारी रोटी बँकच्या माध्यमातून अनेकांची भूक भागवली आहे़ या अनोख्या बँकेचा प्रवास थक्क करणारा आहे हे मात्र नक्की.
सोलापूर शहरातील जमीरखान पठाण हे आपल्या मित्रासह शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते़ त्यावेळी त्यांनी संबधित नातेवाईकास मदत म्हणून काही पैसे दिले, मात्र त्या संबंधित नातेवाईकांनी आम्हाला पैसे नको़़़दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा अशी भावनिक साद घातली़ ही साद जमीरखान पठाण यांच्या काळजाला लागली अन् आपल्या मित्रांना सोबत घेऊन ८ आॅगस्ट २०१७ रोजी रोटी बँक नावाचा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयात कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्यासह जिल्ह्यातील विविध भागातून येणाºया रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण डब्याद्वारे पुरविले जाते़ या डब्यात चपाती, भात, दोन भाज्या, गोड पदार्थ असा मेनू असतो़ दररोज किमान दोनशे ते तीनशे लोकांची भूक या रोटी बँकेच्या माध्यमातून भागविली जाते.
यासाठी रोटी बँकेचे उपाध्यक्ष सोमनाथ सुपाते, सचिव जुबेर सय्यद, सहसचिव अबुजर पीरजादे, खजिनदार इलियास वडवेकर, अॅड़ मुसळे, सत्तार शेख, हनिफ शेख, समीर पठाण आदी शहरातील सामाजिक संस्था, संघटनांची मदत होत आहे़ वाढदिवस व लग्नसमारंभावर अनावश्यक खर्च न करता रोटी बँकेसारख्या उपक्रमाला मदत करावी असे आवाहन रोटी बँकेचे अध्यक्ष जमीरखान पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
वाढदिवस साजरा करा आमच्यासोबतआम्ही मागील दीड वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहोत़ यासाठी विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्ती मदत करतात़ सध्याच्या घडीला दोनशे ते तीनशे लोकांना डबे पुरवितो़ यापुढील काळात आणखीन लोकांना डबे पुरविण्याचे काम करू.लोकांनी वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता रोटी बँकेला मदत करावी़- जमीरखान पठाण, अध्यक्ष, रोटी बँक, सोलापूर