शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

पाचजणांच्या मारहाणीत पती-पत्नी, मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:22 AM

जगन्नाथ तुकाराम शेंडगे, तानुबाई जगन्नाथ शेंडगे व बिरुदेव जगन्नाथ शेंडगे (रा. शेळकेवाडी, ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर ...

जगन्नाथ तुकाराम शेंडगे, तानुबाई जगन्नाथ शेंडगे व बिरुदेव जगन्नाथ शेंडगे (रा. शेळकेवाडी, ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेळकेवाडी येथील जगन्नाथ शेंडगे हे मंगळवारी घरासमोर असताना त्यांच्या शेजारी राहणारे भावकीतील उत्तम शेंडगे, दिलीप शेंडगे व विश्वास चोपडे यांना आमच्या शेतातून तुम्ही चारचाकी वाहन का घेऊन जाता असे विचारले. त्यावेळी उत्तम शेंडगे व दिलीप शेंडगे या दोघा बंधूंसह विश्वास चोपडे यांनी जगन्नाथ शेंडगे यांना शिवीगाळ, दमदाटी करून दिलीप शेंडगे यांनी तेथेच पडलेल्या लाकडी काठीने त्याच्या डोक्यात व नाकावर मारहाण केली, तर उत्तम शेंडगे यांनी त्याची पत्नी तानुबाई हीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मुलगा बिरुदेव भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला विश्वास चोपडे यांनी गच्च धरून दमदाटी केली. राजाराम शेंडगे व सुरवंता शेंडगे यांनी शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जगन्नाथ शेंडगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलीप राजाराम शेंडगे, उत्तम राजाराम शेंडगे, सुरवंता राजाराम शेंडगे (रा. शेळकेवाडी), राजाराम गेनू शेंडगे (रा. धायटी) व विश्वास भोजलिंग चोपडे (रा. वाकी शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.