हनुमंत पवार व सिद्धेश्वर पवार यांच्यात शेतीच्या बांधावरून तक्रारी आहेत. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हनुमंत पवार व पत्नी सिंधू पवार हे दोघे शेतातील वस्तीवर होते. या वेळी पत्नी सिंधू हिने भावजय सावित्री पवार हीस तू आमच्या बांधाच्या कडेला असलेले पावट्याचे वेल का काढून टाकले म्हणून जाब विचारला. या वेळी तिने पावट्याचा वेल व बांध माझ्याच शेतातील आहे, असे म्हणून शिवीगाळ करून निघून गेली. त्यानंतर हनुमंत पवार हा सांगोला येथील मार्केट यार्डातील सुरेश माळी यांच्या दुकानात हमाली काम करत असताना रात्री ९.३० च्या सुमारास पुतण्या दत्तात्रय सिद्धेश्वर पवार व त्याचे मित्र जीपमधून येऊन चुलते हनुमंत यास आपल्या शेतातील बांधाचा वाद आपण गावात जाऊन मिटवू, तुम्ही माझ्यासोबत चला, असे म्हणाला.
ते सर्व जण गावाकडे येत असताना पुतण्या दत्तात्रय याने माझ्या आईला मारहाण का केली, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण करू लागला. गाडी घराजवळ आली असता भाऊ सिद्धेश्वर पवार, पुतण्या दत्तात्रय पवार, रवी मगदूम यांनी काठ्यांनी हातावर, पायावर, पाठीत मारहाण करून जखमी केले. तर त्या वेळी रेखा, सारिका लेंडवे, सावित्री पवार या तिघींनी पत्नीस केस धरून काठ्या व हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या घराची दारे व खिडक्या काठीने फोडून नुकसान केले. याबाबत हनुमंत पवार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----