मंगळवेढा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथे घडली. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रूपाली हणमंत माने (वय २८, रा. हिवरगाव, ता. मंगळवेढा) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून पती हणमंत मच्छिंद्र माने (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रूपालीचा भाऊ बंडोपंत जालिंदर कोडग यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार पती हणमंत माने हा नंदेश्वर येथील एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा पत्नीवर संशय घेत होता. या संशयावरून हणमंत हा तिला शिवीगाळ, दमदाटी करीत होता. ३१ डिसेंबर रोजी सकाळी धारदार हत्याराने डोक्यात वार करून त्याने तिचा खून केला. पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे अधिक तपास करीत आहेत.