घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची, या थराराची परिसरात चांगलीच प्रशंसा होत आहे.
सोमेश्वर भुरले असे या जिगरबाज व्यक्तीचे नाव असून, तो तालुक्यातील ढोरपा येथील रहिवासी आहे. सोमेश्वरची पत्नी सविता शेतात पडलेल्या धानाच्या ओंब्या वेचत होती. तर सोमेश्वर बाजूच्याच बांधात गवत कापत होता. सविता ओंब्या वेचण्याच्या कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला.
सोमेश्वर हातात कुऱ्हाड घेऊन वाघाच्या १ दिशेने धावून गेला. याव सविताला जबड्यात घेतलेला वाघही गांगरून गेला; पण सविताला जबड्यात घेतलेला वाघ काही जागचा हलत नव्हता आणि सविताचा पती सोमेश्वरही माघारी वळायला तयार नव्हता.
कुऱ्हाडीच्या धाकावर सामना
अचानक झालेल्या हल्ल्याने ती भांबावली. मात्र, प्रसंगावधान राखून तिने वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला. या आवाजाने बाजूलाच गवत कापत असलेला तिचा पती धावत आला. तेव्हा त्याच्या पलीला वाघाच्या रुपाने साक्षात काळच फरफटत ओढून नेत असल्याचे त्याने पाहिले; पण स्वतःचा तोल ढळू न देता धाडसाने वाघाच्या दिशेने धावला.
२ हळूहळू सोमेश्वर वाघाजवळ पोहोचला आणि वाघावर कुन्हाड उगारून त्याने सवितास वाघाच्या जबड्यातून बाहेर काढून वाघाकडे पाहत माघारी पावलाने सवितास काही अंतर ओढत नेले. यानंतर वाघ काही अंतरावर दूर गेला.