तरंगेवाडी येथील नवनाथ गावडे हा अलिबाग येथील एका खाजगी कंपनीत कामास आहे. पूनमची सासू मालन गावडे ही आजारी असल्याने तिच्या सेवेसाठी डिसेंबर २०२० मध्ये पुनम तरंगेवाडी येथे गावी आली होती. २२ मार्च रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास पती नवनाथ गावडे हा गावी आला. त्याने झोपेतून उठल्यानंतर पत्नी पूनमला जेवण मागितले असता तिने दिले. त्यावेळी पतीने मद्यप्राशन केले होते. दुपारी दीडच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून बसले असता पती नवनाथ याने पत्नी पुनमचा मोबाईल घेतला. यानंतर पत्नीला घरात बोलावून तू कोणाबरोबरही जास्त वेळ का बोलतेस, असे म्हणून तिच्यावर संशय घेत गालावर चापट मारली. त्याने एवढ्यावरच न थांबता तिला शिवीगाळ, दमदाटी करत चाकूने तिच्या डाव्या हातावर व छातीच्या डाव्या बाजूस मारहाण करू लागला. तिने आरडाओरडा केला असता वडील राजाराम बुरूंगले, सासू मालन गावडे, सासरे चंद्रकांत गावडे, आजोबा सदाशिव येळे यांनी घरात येऊन पती-पत्नीचे भांडण सोडवले. वडील राजाराम बुरुंगले यांनी मुलगी पुनम हीस तत्काळ उपचारासाठी सांगोला येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असून तिची प्रकृती सुखरूप आहे. याबाबत पुनम गावडे हिने पती नवनाथ गावडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
तरंगेवाडीत संशयातून पतीकडून पत्नीवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:21 AM