वैराग : दुसºया बायकोला सोडायला लावले. त्यामुळे दुसºया लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला. याचा राग मनात धरून नवºयाने बायकोचा गळा आवळून खून केला आणि फरार झाला. ही घटना वैराग ( ता.बार्शी ) येथील वैराग- सोलापूर रोडलगत उस्मानाबाद चौकात राहत असलेल्या पालावर सोमवारी मध्यरात्री घडली असून, बुधवारी १३ जूनला सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
वैराग पोलिसांनी आरोपी नवरा लक्ष्मण जगू शिंदे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सविता लक्ष्मण शिंदे (वय ३२) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. यातील आरोपी लक्ष्मण जगू शिंदे ( रा. नांदुर, ता. केज, जि. बीड ) हा आपली बायको व चार लेकरांसह वैराग येथील उस्मानाबाद चौकाजवळील शेतात पाल ( तंबू ) टाकून राहत होता. ते सर्व नातेवाईकांसह विहिरी खोदण्याचे काम मजुरीने करत होते. मयत सविता हिचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत. दोघांत नेहमी भांडणे होत होती. आरोपी लक्ष्मण याने दुसºया महिलेशी लग्न केले होते, परंतु दुसºया बायकोच्या घरच्यांना आरोपी लक्ष्मण याचे पहिले लग्न झालेले आहे, हे माहीत झाल्यानंतर दुसºया बायकोच्या नातेवाईकांनी आरोपी लक्ष्मण यास हाकलून लावले होते.
त्यानंतर आरोपी पहिल्या बायकोकडे आला व नातेवाईकांची माफी मागून मयत सविताबरोबर राहू लागला. कामाच्या शोधात सासरच्या नातेवाईकांसह वैराग येथे आला. तुझ्यामुळे मला माझ्या दुसºया बायकोला सोडावे लागले, त्या लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला असे सविताला सतत म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत होता. याच कारणावरून सोमवारी रात्री त्या दोघांची भांडणे लागली. ही भांडणे नातेवाईकांनी सोडवली. परंतु त्याच रात्री आरोपी नवरा लक्ष्मण याने आपली बायको सविताचा गळा आवळून खून केला आणि पसार झाला, अशी फिर्याद मयत सविताचा भाऊ सागर संतोष जाधव ( रा. नाथापूर , ता. जि. बीड ) याने वैराग पोलिसांत दिली आहे़
घटनास्थळी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करीत प्रेताचे शवविच्छेदन वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत गुंड यांनी केले. आरोपीच्या शोधार्थ तीन पोलीस पथके तैनात केली असून, घटनेचा पुढील तपास सपोनि धनंजय ढोणे हे करीत आहेत.