मोडनिंब येथील बाजारात विक्रीसाठी गाई, म्हशी, बैल यांसह संकरित गाई व शेळ्या मेंढ्या आणत आहेत. माढा तालुक्यासह माळशिरस, पंढरपूर या तालुक्यातून पशुपालक येत असतात. खरेदीसाठी सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक या भागातून व्यापारी येत आहेत. मोडनिंब बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरांची गर्दी होत आहे, असे व्यापारी भारत चव्हाण यांनी सांगितले. या ठिकाणी विविध जाती-प्रजातीची जनावरे येत आहेत. जनावरे पाहून दर ठरविण्यात येत आहे. तसेच शेळ्या मेंढ्यांनाही चांगला दर असल्याचे व्यापारी किरण खडके यांनी सांगितले.
............
कोरोनामुळे अनेक महिने जनावरांचा बाजार बंद होता. आता आठवडा बाजार पूर्वीप्रमाणे भरू लागला आहे. जे खरेदीदार, व्यापारी येत होते ते आता दर शनिवारी येत आहेत. जनावरांच्या बाजारासाठी ग्रामपंचायतीकडून सहकार्य राहणार आहे.
- दत्तात्रय सुर्वे, उपसरपंच, मोडनिंब
.........
बाजार समितीमध्ये भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजारासाठी सोयीसुविधा देण्यात येत आहेत. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच व्यापारी, शेतकऱ्यांकडून वर्गणी घेण्यात येत नाही. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नये.
-सुहास पाटील जमगावकर, व्हाईस चेअरमन, बाजार समिती, माेडनिंब
..........
आठवडा बाजार बंद असल्यामुळे जागेवर खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत होता. आता बाजारात अनेक व्यापारी असल्याने चांगला दर मिळत आहे. तसेच बाजार समितीकडून सुविधा दिल्या जात आहेत.
- संजय चव्हाण, शेतकरी
............
फोटो ओळी : मोडनिंब येथील जनावर बाजारात पशुपालकांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे घेऊन आले आहेत.
..........
(मोडनिंब : ०७मोडनिंब