बार्शी : बार्शी उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील चोरीस गेलेल्या मोटारसायकल चार चाकी वाहने, मोबाइल व लोखंडी गज असा ८ लाख २ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या निर्गती मेळाव्यात परत करण्यात आला. दागिने चाेरीला गेल्यानंतर अनेकांना रडू आलं होतं. आता परत मिळाल्यानंतर चेहऱ्यावर हसू फुटलं.
चोरीस गेलेल्या ९ मोटार सायकली, एक चार चाकी वाहन व ७ मोबाइल व लोखंडी गज असे जप्त करून ठेवलेले साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार व पोलीस विभागाच्या अधिकारानुसार वितरित करण्याचा कार्यक्रम तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात पार पडला. हा मुद्देमाल विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील जप्त केलेले होते त्यानंतर तो पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धारशिवकर,वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादीस परत करण्यात आले.
---
फोटो : १३ बार्शी क्राईम
जप्त केलेले दुचाकी एक चार चाकी वाहन मोबाइल परत करताना डीवायएसपी धारशिवकर, सपोनी जायपत्रे पोलीस निरीक्षक विनय बहिर.