सोलापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौºयावर होते. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना उपचार बिलाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कोरोना उपचाराकरिता महापौरसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला सुद्धा दोन लाख रुपयांचे बिल भरावे लागतेय. तिथे सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील ? असा सवालही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दिलेल्या दोन लाख रुपये बिलाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर कसा गेला याबाबत महापौरांना विचारले असता त्यांनी भाजपच्या पदाधिकाºयांकडे बोट दाखविला.
फडणवीस येण्याअगोदर भाजपच्या काही पदाधिकारी तसेच नेत्यांशी महापौर संवाद साधत होत्या. उपचारा दरम्यान घडलेल्या घटना आणि आठवणी सांगत राहिल्या. सोबत बिलाचा विषयही सार्वजनिक झाला. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे काहीच बोलल्या नाहीत. तरी बर पत्रकार परिषदांमध्ये राज्य विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी रूग्णालयाच्या बिलासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला. फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्य असून खाजगी रुग्णालयात देखील मोफत कोरोना उपचार व्हायला हवा असे मत देखील महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केले.
महापौर यांच्या घरातील एकूण तीन सदस्यांना एका खासगी रुग्णालयात एकूण दहा दिवस उपचार करण्यात आले़ तिघांच्या उपचाराकरिता दोन लाख रुपये बिल खासगी रुग्णालयाला अदा केल्याची माहिती देखील महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.