लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:09 PM2022-03-29T12:09:26+5:302022-03-29T12:18:14+5:30

सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, असं विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केलं.

I have not entered politics for power, said Congress MLA Praniti Shinde in Solapur. | लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते; सत्ता काय असते हे बघितलंय- प्रणिती शिंदे

Next

सोलापूर- माझे वडील हे देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते आणि सत्ता काय असते हे मी बघितलं आहे. त्यामुळे सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, असं विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केलं.

सोलापुरातील यंत्रमाग धारक संघाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलतं होत्या.  महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल असे अंदाज लावले जातं होते, मात्र, त्यांच्या पदरी अद्याप मंत्रिपद पडलेलं नाहीये, त्याअनुषंगाने त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे. 

राजकारणात येण्याअगोदर माझं काम हे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत. मात्र,मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला, आणि हे माझ्या वडिलांना सुद्धा माहिती नव्हतं. त्यांनी राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं होत, असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पवात्यांचं राजकारण चालू होतं, आणि हे बदलण्यासाठी मी राजकारणात आले, मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजून ही जमत नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

Web Title: I have not entered politics for power, said Congress MLA Praniti Shinde in Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.