शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मोबाईलमधून टेक्स मेसेजची लिंक उघडून पाहिली अन् अडीच लाख गायब

By विलास जळकोटकर | Published: February 14, 2024 6:30 PM

फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी मोबाईलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले.

सोलापूर: अनोळखी मोबाईल नंबरवरुन आलेल्या टेक्स मेसमधील लिंक ओपन करुन पाहताच खातेदाराच्या बँक खात्यामधूृन तब्बल २ लाख ६५ हजार रुपये रक्कम क्षणात ट्रान्सफर झाली. ही धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी १:३० ते ४:४५ या कालावधीत कराड अर्बन बँक, चाटी गल्ली येथे घडली. या प्रकरणी खातेदार प्रकाश कृष्णात पाटील (वय- निर्मल नगर, नवीन आरटीओ, विजापूर रोड सोलापूर) यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दिल्याने शनिवारी गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे विजापूर रोडवरील निर्मल नगरात राहतात. त्यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी १:३० ते पावणेपाच या दरम्यान, चाटी गल्ली येथील कराड अर्बन बँकेत आले.

तेथे अनोळखी ९४८१३१६२१५ या मोबाईलवरुन dear sbi user your sbi yono A/c Will be blocked please update your pancard today login with sbi YONO getbankin click hear http://cptishortgy-SBI KYC असा मेसेज आला. त्यानुसार फिर्यादीचे एसबीआय योनग ॲप ओपन झाले. त्यांनी विचारलेली माहिती फिर्यादी व ओटीपी अपलोड केला. तेव्हा फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी मोबाईलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले. अशा प्रकारे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि ४२० सह आयटी ॲक्ट ६६ (सी)(डी) अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा करीत आहेत.

कोणत्याही फसव्या लिंकवर जावू नका अथवा क्लिक करुन नका. याबद्दल आम्ही वेळोवेळी आवाहन करीत आहोत. फसले गेल्यानंतर आर्थिक फसवणूक तर होतेच शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. प्रत्येकांनी वेळीच दक्षता घ्यावी. - श्रीशैल गजा, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सोलापूर आयुक्तालय, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcyber crimeसायबर क्राइम