सांगोला शहरात संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदा नागरिकांनी गणपती विसर्जनासाठी विहिरींपर्यंत येऊन गर्दी करणे टाळायचे आहे. विसर्जनाची जबाबदारी सांगोला नगरपरिषदेने घेतली आहे. शहरवासीयांनी ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी नगरपरिषदेमार्फत तयार केलेल्या संकलन केंद्रात ‘श्रीं’ची मूर्ती जमा करावी. त्यामुळे सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी न होता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळणार आहे.
----
येथे जमा करा ‘श्रीं’च्या मूर्ती
यावर्षी सांगोला नगरपरिषदे मार्फत
वंदे मातरम चौक
पंचायत समितीशेजारी
आठवडा बाजार (बाहेरील विहीर),
कुंभार गल्ली विहीर
न्यू इंग्लिश स्कूल मैदान
मिरज रोड रेल्वे फाटक व
सांगोला नगरपालिका या ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. नागरिकांनी सायंकाळी ६ पर्यंत ‘श्रीं’ची मूर्ती संकलन केंद्रावर जमा करून नगरपालिकेस सहकार्य करावे.
चिंचोली तलावात होणार विसर्जन
या मूर्तींचे सांगोला नगरपरिषदेमार्फत विधिपूर्वक ‘चिंचोली तलाव, महुद रोड येथे रथाद्वारे विसर्जन करण्यात येणार आहे. आपल्या बाप्पांना तिसऱ्या लाटेचे निमित्त होऊ न देण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगराध्यक्षा राणी माने यांनी केले आहे.
----
सांगोला नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेली श्री मूर्ती संकलन केंद्र.