कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हाताची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर हे सूत्र पाळणे अत्यावश्यक झाले आहे. मागील वर्षीच्या काळात राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू राहावे यासाठी मोबाइल करा दान हा उपक्रम राबवला होता. कोरोना काळात घरट सोडायचं नाही, काळजी घ्या, माणसातील देवांना सलाम, अफवा कोरोनापेक्षा भयंकर अशा अनेक चित्ररूपी संदेशातून पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. तसेच यावर्षी आपल्या कुटुंबीयांसमवेत मास्क परिधान करून अनोख्यापद्धतीने गुढी उभारत आरोग्याचा सामाजिक संदेश दिला आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? ही त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कोट ::::::::::::::
शासनाने घातलेले निर्बंध जनतेच्या हितासाठी आहेत. या काळात नागरिकांच्या संयमाची कसोटी लागली असून, कोरोना संपूर्ण आटोक्यात येईपर्यंत मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर अपरिहार्य बनला आहे. प्रतिबंध हाच प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
- राजेश क्षीरसागर
शिक्षण उपसंचालक, पुणे