शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मी फक्त महापौरांनाच भेटणार; सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरेंनी दाखवून दिला नगरसेवकांना प्रोटोकॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:15 PM

सोलापूर :  महापालिकेचे नवे आयुक्त दीपक तावरे रुजू झाले. महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी भाजपा पक्ष ...

ठळक मुद्देमी सहकार खात्यात काम केले आहे. सोलापूर काय कुठेही काम करण्याची माझी तयारी - तावरेउस्मानाबाद जिल्हा बँकेचा प्रशासक असताना थकबाकी कशी वसूल केलीय ते राजकीय नेत्यांना विचारा - तावरे

सोलापूर :  महापालिकेचे नवे आयुक्त दीपक तावरे रुजू झाले. महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी भाजपा पक्ष मिटिंगकडे यावे, असा निरोप नगरसेवकांकडून देण्यात आला. मात्र ‘प्रोटोकॉल’नुसार मी फक्त महापौरांनाच भेटणार, असे सांगून आयुक्तांनी या बैठकीत जाणे टाळल्याची चर्चा दिवसभर मनपा वर्तुळात होती. 

महापालिकेचा पदभार घेण्यापूर्वी दीपक तावरे यांनी सकाळी ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांचे दर्शन घेतले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले. उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता संदीप कारंजे, कामगार कल्याणचे विजयकुमार कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पदभार घेतला. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.

महापौर बनशेट्टी यांनी त्यांना शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम आणि स्मार्ट सिटीची कामे आदी गोष्टींना भाजपाने प्राधान्य दिले असून, त्याबाबत आपणही सहकार्य करावे, असे सांगितले. यादरम्यान पंडित दीनदयाळ सभागृहात भाजपा नगरसेवकांची सर्वसाधारण सभेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरू होती. महापौरांशी चर्चा सुरू असताना नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी आयुक्त दीपक तावरे यांना, नगरसेवक तुमची वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त तावरे यांनी, ‘मी प्रोटोकॉलनुसार महापौरांना भेटणार’, असे सांगितले. महापौरांची भेट घेऊन ते आपल्या कार्यालयात आले. यानंतर विविध पक्षीय नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. 

उस्मानाबाद बँकेची वसुली कशी केली ते विचारा : तावरे - पत्रकारांशी बोलताना आयुक्त तावरे म्हणाले, मी सहकार खात्यात काम केले आहे. सोलापूर काय कुठेही काम करण्याची माझी तयारी आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेचा प्रशासक असताना थकबाकी कशी वसूल केलीय ते राजकीय नेत्यांना विचारा. महापालिकेतील सर्व पदाधिकाºयांशी, नगरसेवकांशी समन्वय साधून काम करेन. - डॉ. अविनाश ढाकणे यांनी चांगले काम केले आहे. आपणही स्मार्ट सिटीच्या कामावर लक्ष ठेवून काम करणार आहोत. जे नियमबाह्य असेल ते कदापि स्वीकारले जाणार नाही. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्बन फूड सिस्टीम हा प्रोजेक्ट राबविणार आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती आपण लवकरच देऊ, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणBJPभाजपा