सोलापूर : राज्यभरातील शहरातील मैदाने व गृहनिर्माणमधील मोकळ्या जागा सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ, शेतकºयांनो आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग असे करा की सोलापूर जिल्हा हा सेंद्रिय शेतीचा व कृषी पर्यटक जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. आत्मा अंतर्गत उत्कृष्ट शेतकरी मेळावा व शेतकरी गटांच्या सन्मान सोहळ्यात देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते. तुम्ही विषमुक्त अन्नधान्य पिकविले तरच आमचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे, उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होत असेल तर पिकांना दिलेल्या पाण्यातूनही आजार होणारच असल्याचे सहकार मंत्री म्हणाले. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांच्या मागे शासन उभे राहील असे सांगून शेतकºयांनी वेगवेगळी उत्पादने घ्यावीत असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला संचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,आत्माचे विजयकुमार बरबडे, रवींद्र माने, मनोहर मुंढे आदीसह कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी ३१ शेतकरी व ७ शेतकरी गट तसेच अधिकाºयांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकºयांनी विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था केली होती. ‘सोलापुरी हुरडा’ पुण्यात विक्री करु पुणे येथील अभिनव क्लबच्या ज्ञानेश्वर बोडके यांनी ‘सोलापुरी चवदार हुरडा’पुण्यात पाहिजे तेवढा विक्री करु असे सांगताना शेतकºयांनी मागणीप्रमाणे पीक घेण्याचे आवाहन केले. पिकांची फेरपालट करा, मिश्रपीके घ्या, महिलांवर मार्केटिंगची जबाबदारी सोपवा असे शेतकºयांना उद्देशून सांगितले.
सोलापूरची कृषी पर्यटन जिल्हा म्हणून ओळख व्हावी : सहकारमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:22 PM
सोलापूर : राज्यभरातील शहरातील मैदाने व गृहनिर्माणमधील मोकळ्या जागा सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ, शेतकºयांनो आपल्या शेतीमालाचे ...
ठळक मुद्दे‘सोलापुरी चवदार हुरडा’पुण्यात पाहिजे तेवढा विक्री करु - सुभाष देशमुखपिकांची फेरपालट करा, मिश्रपीके घ्या, महिलांवर मार्केटिंगची जबाबदारी सोपवा - सुभाष देशमुख