राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूरलोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब घेण्याबाबत निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती आहे. उमेदवारांना दररोज खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आहे का हे तपासण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उमेदवाराचा खर्च मर्यादेबाहेर गेल्यास निवडून आलेले पद रद्द होण्याचा धोका असतो, अशी माहिती लोकसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक आणि सोलापूर महापालिकेचे उपायुक्त त्रिेंबक ढेंगळे -पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रश्न : खर्चाविषयी उमेदवारावर काय बंधने आहेत?उत्तर : लोकसभा उमेदवारासाठी खर्च मर्यादा ७० लाख आहे. त्यापेक्षा जादा खर्च झाल्यास निवडून आलेल्या उमेदवाराचे पद रद्द होऊ शकते. उमेदवाराने दररोजच्या खर्चाचा तपशील दुसºया दिवशी निवडणूक कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. असे न झाल्यास कार्यालयातर्फे उमेदवाराला नोटीस दिली जाते.
प्रश्न : उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब कसा काढला जातो ? उत्तर : प्रत्येक उमेदवाराच्या मागे व्हिडीओ पथक कार्यरत असते. बैठका, सभा, रॅलीमध्ये कोणत्या बाबींचा वापर झाला त्यावरून खर्च काढला जातो. उदा. बॅनर, पोस्टर, टोप्या, झेंडे यांचा वापर किती झाला हे पाहून खर्च तपासला जातो. याशिवाय उमेदवाराने सभा, रॅली काढण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या का. त्या परवान्याचे शुल्क, याशिवाय लोकांनी केलेल्या तक्रारीवरून खातरजमा करून तो खर्च उमेदवाराच्या हिशोबात खर्ची टाकतात.
आयोगाकडे गोपनीय रिपोर्टउमेदवाराच्या खर्चाबाबत निवडणूक निरीक्षक म्हणून अभय गुप्ता यांच्याकडे जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तीन टप्प्यात खर्चाची तपासणी केली जाते. निरीक्षक अचानकपणे भेट देऊन पाहणी करतात. प्रत्येक मतदारसंघात अशा तीन भेटी असतात, याबाबत पाच अहवाल निवडणूक आयोगाकडे गोपनीयपणे सादर केले जातात अशी माहिती खर्च निरीक्षक तथा महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तीन निरीक्षक आहेत कार्यरतलोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण, खर्च आणि स्विप म्हणजे मतदार जागृती करण्यासाठी असे तीन निरीक्षक कार्यरत आहेत. याचबरोबर निवडणुकीवर परिणाम करणाºया पैसे, दारू, साहित्य वाटपावर लक्ष ठेवले जाते. यासाठी व्हिजीलन्स पथके तयार आहेत. या पथकास बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त असून, अचानकपणे वाहन तपासणी केली जाते.