शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘मी असते तर अवधूतने आत्महत्या केली नसती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 2:07 PM

युवकाच्या आत्महत्येनंतर प्रेयसी थेट अक्कलकोट पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी टिळक गल्लीतील तरुणाने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले प्रेयसीने शनिवारी पहाटे उत्तर पोलीस ठाणे गाठून तपास अधिकाºयासमोर भावनेला वाट मोकळी करून दिली

दुधनी : दोन दिवसांपूर्वी टिळक गल्लीतील तरुणाने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, घटनेनंतर ती मुलगी पोलीस ठाण्यात दाखल होऊन ‘मी अक्कलकोटमध्ये असते तर अवधूतने आत्महत्या केली नसती’, असं सांगत भावनेला वाट मोकळी करून दिली.

अवधूत तुळशीराम आवटे (वय २३, रा. टिळक गल्ली, अक्कलकोट) याचे एका युवतीबरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याची कल्पना मुलीच्या आई-वडिलांना होती. दोघेही लग्न करणार होते. परंतु ‘आधी करिअर करू, नंतर लग्न करू’ अशी भावना त्या मुलीची होती. मात्र युवकाला लग्नाची घाई होती. शिवाय ती मुलगी अल्पवयीन होती. दोघे सतत एकमेकांना भेटत होते. ती बाहेरगावी शिकत होती तर अवधूत अक्कलकोट येथे बी. कॉम. च्या दुसºया वर्षात शिकत होता. दोघे सतत फोनवर संपर्कात असायचे. 

आत्महत्या करण्याअगोदर अवधूतने बाहेरगावी जाऊन त्या मुलीची भेट घेतली होती. तिला अक्कलकोटला ये म्हणून  त्याने विनंती केली होती. मात्र नकार दिल्याने अवधूत तिच्याशी भांडला होता. याच संतापाच्या भरात त्याने अक्कलकोटला येऊन  प्रेयसीचा फोटो व चिठ्ठी स्वत:जवळ ठेवून आत्महत्या केली.

मुलीनेही केला आत्महत्येचा प्रयत्नअवधूत आवटे याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रेयसीने शनिवारी पहाटे उत्तर पोलीस ठाणे गाठून तपास अधिकाºयासमोर भावनेला वाट मोकळी करून दिली आणि आत्महत्या करण्याची भाषा वापरत ती पोलीस ठाण्यातून पळून जाऊ लागली. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधानता बाळगत त्या मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिची समजूत काढली आणि तिला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मुलाच्या घरासमोर जाऊन काहीवेळ ती रडतही बसली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी