शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

पाऊस जाणायचाय तर मग पर्जन्योत्सुक व्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:10 PM

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने ...

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाचवेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधूनमधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाºया प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आई-वडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन् अश्रूंचे पाझर लागून राहावेत तसं या पावसाचं झालंय.

महिनाभर काबाडकष्ट करून कशीबशी सुट्टी मिळवून गावाकडे जाताना बस चुकावी अन् रात्रभर वाट बघत बसल्यावर घरातले अणुरेणू डोळ्यापुढे फेर धरून नाचत राहावेत तसे या पावसाने फेर धरलेत. मायबापापासून फारशी कधी विलग न झालेली एखादी हरीण डोळ्याची हळद ओली नवविवाहिता पहिल्यांदा माहेरी जाताना तिला प्रवासातली रात्र मोठी वाटत जाते आणि भवतालचा काजळअंधार अधिक गहिरा वाटत जातो, नकळत एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून येत राहते अन् माहेरची ओढ अधिकच तीव्र होत जाते. कधी एकदा दिवस उजाडेल आणि घराच्या उंबरठ्यावर जाऊन धडकेन असं होऊन जाते तसं या रात्रभर कोसळणाºया पावसाचं झालंय. 

ज्यांचे कुणाचे छत्र नुकतेच हरवलेले असते त्यांना रात्रीचा पाऊस गुदमरून टाकतो, मेघात त्यांना मायबाप कधी दिसू लागतात अन् डोळ्यातला पाऊस कधी कोसळू लागतो काही केल्या उमगत नाही. जन्मदाते गेल्यानंतरची पहिली पाऊसरात्र कशी वाटते ते सांगता येत नाही. रात्रीच्या पावसात एका मोठ्या  वटवृक्षाखाली उभं असताना एखादी लकाकणारी वीज यावी अन् तिने अख्खं झाड आपल्यासोबत घेऊन जावं, आपण तसंच हतबल होऊन तिथंच त्यांची वाट बघत रात्रभर रडत उभं राहावं. त्यांची आठवण येत रहावी. त्यांनी ज्या करंगळीला धरून आपल्याला चालवलं तिला रात्रभर शहारे येत राहावेत, त्यांनी थोपटलेल्या पाठीवर रात्रभर काटे येत राहावेत, त्यांनी आपल्या भल्यापोटी कधी हातावर पट्ट्या मारल्या असतील त्या हातावरच्या त्या वळांनी पुन्हा उमटत जावं, आपल्याला सायकलवरून शाळेत सोडताना त्यांनी हात हलवून आपल्याला धीर देत राहावं अन् तो त्यांचा हात त्या रात्रभरच्या पावसात तरळत रहावा.

कधी आजारपण आलं तर त्यांनी रात्रभर माथ्यापाशी बसून राहावं आणि आपण डोळे भरून त्यांच्याकडे पाहत राहावं. जगाशी कधी भांडण झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्याला हत्तीचे बळ देणाºया त्या जन्मदात्याने हळूच आपल्यासाठीही कधी अश्रू ढाळावेत आणि आपली चुकून त्याकडे नजर जावी. त्यांनी म्हणावं ‘काही नाही डोळ्यात जरा धूळ गेली होती रे !'. त्यांच्या या बोलण्याने आपल्या डोळ्यांना अश्रूंची धार लागावी अन् आपण आयुष्यात एकदाच त्यांच्या छातीवर डोकं टेकवून मनसोक्त रडावं तसं या पावसाचं झालंय.

आठवणींचे अनेक श्याममेघ एकत्र आणून नुसती काळीजवीणा झंकारत रहावी तसं या पावसाचं झालंय. रात्रभर कुणीतरी आपलंच पण अनामिक असं माणूस उंबरठ्यापाशी आलंय असं वाटत राहावं असं या रात्रभर दाराशी लगटून राहिलेल्या पावसाचं झालंय. त्याच्याही मनात तेच आलंय जे आपल्या मनात आलंय, त्याच्या आठवणींना उधाण आलंय कारण त्याने आपल्याला प्रतीक्षेत बरंच ताठकळवलंय ! दार उघडून बाहेर बघा त्याला तेच सांगायचेय जे तुम्हाला बोलायचेय. पाऊस तल्लीन होऊन पडतोय,  संततधार लागलेल्या या पावसाचे हे असं गारुड झालंय ! पाऊस घराबाहेर कोसळत असताना त्यांच्याही अंतरंगात रिमझिम सुरु असते. कालिदासाने रचलेल्या मेघदूताला जाणून घ्यायचं असेल तर साक्षर व्हावं लागतं; मात्र पावसाचं काळीज जाणून घ्यायचं असेल तर पर्जन्योत्सुकच व्हावं लागतं. मग त्यांचे सूक्त निसर्गच रचतो !  - समीर गायकवाड(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस