आपणास सरकारी नोकरीची आवड आणि हौस होती
एका गायीसाठी दिवसभरासाठी साधारणतः वीस ते पंचवीस किलो चारा दिला जातो. साधारणतः आठ ते दहा किलो सुग्रास व भरडा दिला जातो. सध्या दुधाला २५ ते २६ रुपये भाव मिळतो. ३५ ते ४० रुपये भाव मिळण्याची गरज आहे. आमच्या तीस गायी आहेत. गणेश, अमोल अशी भावंडे मिळून हा व्यवसाय आम्ही करतो. तरुणांच्या हाताला रोजगार आणि शेतीला खत देणारा हा व्यवसाय आहे, असेही दाढे यांनी सांगितले.
योग्य नियोजन करून आधुनिक पद्धतीने, निष्ठेने स्वत: कष्ट करण्याची तयारी ठेवून दुधाचा व्यवसाय करून कालवडींची पैदास केली तर तो खूप परवडणारा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता दुधाचा व्यावसाय केला पाहिजे आणि सरकारने दुधाला चाळीस रुपये भाव दिला तर हा व्यवसाय नक्कीच खूप आर्थिक फायदा मिळवून देणारा आहे, असे दूध उत्पादक सागर दाढे यांनी सांगितले.