सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतं नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल लगेचच कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कांद्याबाबत माहिती दिली.
अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. नाफेडने खरेदी केली किंवा व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीत. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल .स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनुदान संदर्भात सांगितले आहे की सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला मग अनुदान संदर्भात देखील अंतिम निर्णय होईल.असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी कडून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नव्हती. कांदा उत्पादक शेतकरी व विरोधी पक्ष राज्यभरात कांद्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, आंदोलन करत आहेत, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता,त्यांनी उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपया देखील दिला नाही.उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या, एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त देण्याचा निर्णय घेतला.ज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे .१२ हजार कोटी रुपयांची निधी सरकार आल्यापासून मागील सात महिन्यात शेतकऱ्यांना दिलेत
महाविकास आघाडीचा 'एमआयएम'ला पाठिंबा आहे का हे जाहीर करावं - विखे-पाटील
औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर नामांतर केले आहे. या बाबतीत इम्तियाज जलील यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधाची आहे. राज्यसरकारने ठराव करून केंद्रपर्यंत पाठपुरावा केला, मोदीजी आणि अमित शाह यांनी संमती दिली. याआधी केवळ वल्गना केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा महाविकास आघाडीच्या काळात सत्कार होत होता. याच एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, मात्र इम्तियाज जलिलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? हे त्यांनी जाहीर केले पाहिजे.