सोलापूर : काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. अधिकाºयांना कोंडण्यात आले, यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का, असे विचारले असता हा अधिकार संबंधित अधिकारी व कर्मचाºयांचा आहे. संबंधित अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, तो त्यांचा अधिकार आहे. मी सांगण्याची किंवा आदेश देण्याची गरज नाही. अधिकाºयांमध्ये गुन्हा दाखल करण्याची हिंमत नसेल तर त्यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा, असा सल्लाही यावेळी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला.
महानगरपालिकेशी निगडित विविध कामे तत्काळ आणि घरी बसून करता यावीत, नागरिकांचा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने आॅनलाईन पद्धत विकसित करण्याचा आमचा मानस आहे. १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्या टॅक्स पावती, पाणीपट्टी बिल आदी विविध पद्धतीच्या कराची पावती ही हाताने केली जाते. या प्रकारामध्ये वेळ तर जातोच, मात्र कर्मचाºयांकडून गफलत होऊ शकते. शहरवासीयांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारे सर्व परवाने हे आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. महापालिकेतर्फे दिली जाणारी प्रमाणपत्रे ही आॅनलाईन कशी देता येतील, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. दररोज हजारो लोक कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त महापालिकेत येत असतात, त्यांचा त्रास वाचावा व त्यांची बसल्या ठिकाणी सर्वप्रकारची कामे ही आॅनलाईन झाली पाहिजेत.
शहरातील इमारत परवाना हा आॅनलाईन पद्धतीने दिला जात असून याला पूर्वी विरोध करण्यात आला होता. आता १०० टक्के परवाने हे आॅनलाईन पद्धतीने दिले जात आहेत. विविध प्रकारचे कर भरणारे मिळकतदार ५ टक्के आहेत. महापालिकेकडे कमीत कमी माणसे आली पाहिजेत, त्यांची जास्तीत जास्त कामे आॅनलाईनवरूनच व्हावीत. रोज काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आॅनलाईनच्या कामाचे नियोजन करीत आहोत.
अधिकारी व कर्मचाºयांना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामाबद्दल लोकांचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.