अकलूज येथे प्रांत कार्यालयासमोर अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, या मागणीसाठी तिन्ही गावचे ग्रामस्थ २३ दिवस साखळी उपोषणास बसले आहेत. त्यांची भेट घेऊन प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा देताना राज्य सरकार दुजाभावातून विकास कामात राजकारण करीत असल्याचा आरोप केला.
आ. प्रशांत परिचारकांनी आपल्या भाषणातून अकलूज ही आशिया खंडातील आदर्श ग्रामपंचायत आहे. या भागाचा चौफेर विकास मोहिते पाटील घराण्याने साधला आहे. या ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाली तर अधिकचा विकास होईल, असे स्पष्ट केले.
प्रास्ताविकात उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी, उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे. त्याची १७ जुलै रोजी दुसरी तारीख आहे. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुते सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबु, ॲड. रणजित भोसले, संजय गोरवे, नंदकुमार केंगार यांच्यासह तिन्ही ग्रामपंचायतींचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी लव्हाळे यांनी केले.
150721\181-img-20210715-wa0010.jpg
अकलुज येथे अकलूज-माळेवाडी,नातेपुते ग्रामस्थांच्या उपोषणास भेटी प्रसंगी बोलताना विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,याप्रसंगी आमदार.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक व ग्रामस्थ