शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

कॅमेऱ्यासमोरुन विद्यार्थी दोनदा हलला तर नापासच! प्रथमच 'ॲन्ड्राईड वेब'चा वापर

By शीतलकुमार कांबळे | Published: June 13, 2024 1:45 PM

२१ जुलै रोजी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा

शीतलकुमार कांबळे, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 'पीएच.डी. प्रवेशपूर्व पेट-९ परीक्षा २१ जुलै २०२४ रोजी होणार आहे. यंदा प्रथमच ही परीक्षाऑनलाइन माध्यमातून ॲन्ड्राईड वेब बेस्ड पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली. विद्यार्थी कॅमेऱ्यासमोरुन दोनदा हलला तर त्याला बाद ठरविण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडून पीएच.डी. प्रवेशासंदर्भात प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरिता १३ जून ते ६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरावे लागणार आहे. यंदा ही परीक्षा ऑनलाइन अँड्रॉइड बेस्ड पद्धतीने होणार असल्याने परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'पेट' देता येणार आहे.

विद्यापीठात यावेळी 'पीएच.डी'साठी ४७४ जागा आहेत. विषयनिहाय संशोधक मार्गदर्शकांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'पेट'साठी दोन पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. 

प्रत्येकी एक तासाचा वेळ

विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या ॲन्ड्राईड मोबाइल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही परीक्षा देता येणार आहे. पण, कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार आहे. पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरonlineऑनलाइनexamपरीक्षा